मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार; सरकारचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 09:17 PM2018-12-27T21:17:26+5:302018-12-27T21:25:54+5:30

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला केसरकरांचं आश्वासन

state government assures to take back cases registered against maratha agitators | मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार; सरकारचं आश्वासन

मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार; सरकारचं आश्वासन

Next

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं पुकारलेल्या बंद दरम्यान आंदोलकांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. याबद्दलचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मंत्रालयात केसरकर यांची भेट घेतली. त्यानंतर केसरकर यांनी हे आदेश दिल्याची माहिती समन्वयक अनिल शिंदे यांनी दिली. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५, २६ जुलै आणि ९ ऑगस्टला मराठा समाजानं केलेल्या बंद पुकारला होता. 

शिंदे म्हणाले की, आंदोलनादरम्यान बहुतेक निरपराध आंदोलकांवर दंगल करणे, जाळपोळ करणे, पोलिसांवर हल्ले करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यासंबंधात मराठा समाजाच्या समाजाच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या शिष्टमंडळात विजय भोसले, प्रफुल्ल पवार, अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे, डॉ. सुभाष कदम, दशरथ पाटील, स्वप्नील काटकर, विलास सुद्रीक व संदीप सावंत यांनी आंदोलकांची बाजू मांडली. या बैठकीत गृहखात्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), आणि विधी व न्याय विभागाचे वकील उपस्थित होते. केसरकर यांनी यावेळी मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या तत्वत: मान्य करून त्यासंदर्भात गुन्हे मागे घेण्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.

जे गुन्हे आम्ही केले नाहीत ते गुन्हे आमच्यावर दाखल करून आम्हा तरुणांवर गुन्हे कबूल करण्यासंदर्भात दबाव आणणे हे चुकीचे असल्याचे म्हणणे शिष्टमंडळातर्फे मांडण्यात आले. यासंबंधात चौकशी करून असे सर्व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. तसेच कोपरखैरणे येथे झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या रोहन तोडकर या मराठा तरुणाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 

Web Title: state government assures to take back cases registered against maratha agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.