राज्य सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांना ११०० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:09 AM2018-04-30T05:09:55+5:302018-04-30T05:09:55+5:30

बोंडअळीग्रस्त शेतकºयांना लवकरच ११०० कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

State government decision; 1100 crore aid to farmers | राज्य सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांना ११०० कोटींची मदत

राज्य सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांना ११०० कोटींची मदत

googlenewsNext

मुंबई : बोंडअळीग्रस्त शेतकºयांना लवकरच ११०० कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बोंडअळीने ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी राज्यात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणात आढळले होते. त्यात विदर्भातील कापूस
उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. राज्य सरकारने केंद्राला ३,३७३ कोटी मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. संबंधित मदत येण्याआधी सरकारने स्वत:च्या हिश्शाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
कीटकनाशकांमुळे भात व इतर खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. संबंधित शेतकºयांनाही उपरोक्त निधीतून मदत दिली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या मदतीचे वितरण सुरू होईल, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी दिली. ३० एप्रिल व १ मे रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्यानंतर मदतीबाबत अधिक माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी व त्यांचे बँक खात्यांची यादी तयार केली आहे. शेतकºयांच्या खात्यांवर ही मदत जमा होईल.

मदतीसाठी कृषिमंत्री फुंडकर यांचा पुढाकार
नागपूर येथे २२ एप्रिलला कापसावरील बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत  बैठक झाली होती. त्यास केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आदी उपस्थित होते. बैठकीत नुकसानीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आल्याचे पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले होते. नागपूरसह वगळण्यात आलेल्या जिल्ह्यांचा नव्या प्रस्तावात समावेश केला असून नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरच मदत देणार असल्याचे त्यांनी बैठकीनंतर जाहीर केले होते.

Web Title: State government decision; 1100 crore aid to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.