राज्य शासन उदासीन का?
By admin | Published: August 5, 2014 01:21 AM2014-08-05T01:21:58+5:302014-08-05T01:21:58+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके जाहीर करण्यासाठी राज्य शासनाला अजूनही जाग आली नाही.
Next
पुणो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके जाहीर करण्यासाठी राज्य शासनाला अजूनही जाग आली नाही. इतर राज्यांतील ज्या खेळाडूंनी पदके जिंकली त्या प्रत्येक खेळाडूंच्या राज्य सरकारने त्यांची भारतात परतण्याची वाट न पाहता त्यांना रोख पारितोषिके जाहीर केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रमध्ये शासनाच्या दिरंगाईमुळे नाराजीचे सूर उमटत आहेत.
ग्लास्गो येथे संपलेल्या या स्पर्धेत त्रिपुरा, हरियाना, पंजाब, कर्नाटक, हैदराबादसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील पदक विजेत्यांना 5क्, 3क्, 25, 2क् लाख अशी रोख पारितोषिक जाहीर केली. पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पारितोषिकांची घोषणा करण्यासाठी कोणाची वाट पाहत आहेत? अशी चर्चा राज्याच्या क्रीडा क्षेत्रत सुरूझाली आहे. पदक विजेत्यांना काही रोख पारितोषिकांची घोषणा करण्यासाठी शासन एवढे उदासीन का? महाराष्ट्रातून राही सरनोबत (नेमबाजी, सुवर्ण), अयोनिका पॉल (नेमबाजी, रौप्य), गणोश माळी (भारोत्ताेलन, कांस्य), चंद्रकांत माळी (भारोत्ताेलन, कांस्य) व गणोश ओतारी (भारोत्ताेलन, कांस्य) हे पदक विजेते खेळाडूसुद्धा पारितोषिकांच्या घोषणोची अतुरतेने वाट पाहत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलेली राही सरनोबत हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्या वेळी त्यांनी राज्यातील सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख पारितोषिके जाहीर करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री आज किंवा उद्या करणारच आहेत. त्यांच्यासाठी भरघोस रक्कम आम्ही जाहीर करणार आहोत.
-अॅड. पद्माकर वळवी, क्रीडामंत्री