राज्य शासकीय कर्मचारी 3 दिवस संपावर
By Admin | Published: January 10, 2017 10:26 PM2017-01-10T22:26:47+5:302017-01-10T22:44:19+5:30
राज्यभरातील शासकीय अधिकारी-कर्मचारी 18 ते 20 जानेवारी दरम्यान संपावर जाणार आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा ही कर्मचा-यांची मुख्य मागणी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - राज्यभरातील शासकीय अधिकारी-कर्मचारी 18 ते 20 जानेवारी दरम्यान संपावर जाणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासकिय कर्मचा-यांनी संप पुकारला आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागण्यांबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याबाबत याबैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. 1 जाने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा ही कर्मचा-यांची मुख्य मागणी आहे.
याशिवाय निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, महिला अधिकाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मिळावी, पाच दिवसांचा आठवडा करावा तसेच रिक्त पदं योग्य वेळेत भरावी अशा विविध मागण्यांसाठी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.