मराठा समाजाच्या सवलतीबाबत राज्य सरकार सकारात्मक - चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:25 AM2020-07-09T05:25:20+5:302020-07-09T05:25:50+5:30

मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

State Government is positive about the concessions of Maratha community - Chavan | मराठा समाजाच्या सवलतीबाबत राज्य सरकार सकारात्मक - चव्हाण

मराठा समाजाच्या सवलतीबाबत राज्य सरकार सकारात्मक - चव्हाण

Next

मुंबई : मराठा समाजासाठी यापूर्वी जाहीर झालेल्या; परंतु अद्याप प्रलंबित उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार सकारात्मक असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्याबरोबर समितीचे सदस्य तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यासह न्यायालयात राज्य शासनाची बाजू मांडणारे विधीज्ञ उपस्थित होते. रोजी सर्वोच्च न्यायालयात १५ जुलैलाहोणाऱ्या सुनावणीसंदर्भात भक्कमपणे बाजू मांडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आरक्षणासंदर्भातील मूळ याचिकेवरील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष व्हावी, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तसेच येत्या दोन -तीन दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात विविध बैठका आयोजित केल्या आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: State Government is positive about the concessions of Maratha community - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.