राज्य सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 07:02 AM2022-09-17T07:02:29+5:302022-09-17T07:18:06+5:30

आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा असंही मुख्यमंत्री म्हणाले.

State government to recruit 75,000 employees; CM Eknath Shinde's announcement | राज्य सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्य सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७५ वा वर्धापन दिन (अमृत महोत्सव) होत आहे, त्यामुळे सरकारने ७५ हजार कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जाहीर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानंतर नाट्यगृहात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ७५ हजार कर्मचाऱ्यांमध्ये प्राध्यापकांची भरती होणारच आहे. जी पदे मंजूर आहेत, त्यांचीच भरती होईल. 

आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा. दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘मोठा कार्यक्रम’ केल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतिगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना निधी देण्याचा विचार केला जाईल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Web Title: State government to recruit 75,000 employees; CM Eknath Shinde's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.