राज्य शासनाकडून २०१५च्या बॅचमधील सात आयएएस अधिका-यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:41 AM2017-09-29T01:41:49+5:302017-09-29T01:42:12+5:30

अमन मित्तल यांची बदली सहाय्यक जिल्हाधिकारी; कळवण, जि.नाशिक आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कळवण येथे करण्यात आली आहे.

State Government transfers seven IAS officers in 2015 batch | राज्य शासनाकडून २०१५च्या बॅचमधील सात आयएएस अधिका-यांच्या बदल्या

राज्य शासनाकडून २०१५च्या बॅचमधील सात आयएएस अधिका-यांच्या बदल्या

Next

मुंबई : राज्य शासनाने गुरुवारी २०१५च्या बॅचमधील सात आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यानुसार, अमन मित्तल यांची बदली सहाय्यक जिल्हाधिकारी; कळवण, जि.नाशिक आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कळवण येथे करण्यात आली आहे. आयुष प्रसाद हे पुणे जिल्ह्यातील खेड उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी व घोडेगाव आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाचे अधिकारी असतील. सचिन ओंबासे यांची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

अन्य बदल्या अशा
विनय गौडा - सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी तळोदा, जि.नंदुरबार. भुवनेश्वरी एस. - सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, जि. यवतमाळ. अजित कुंभार - सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी किनवट, जि.नांदेड. राहुल कर्डिले - सहाय्यक जिल्हाधिकारी; सेलू, जि.परभणी.

Web Title: State Government transfers seven IAS officers in 2015 batch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.