राज्य सरकार करणार मायक्रोसॉफ्टशी भागिदारी
By admin | Published: June 25, 2015 01:19 AM2015-06-25T01:19:03+5:302015-06-25T01:19:03+5:30
राज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या भागीदारीतून स्मार्ट एमआयडीसी, लघु व मध्यम उद्योगांना चालना दिली
मुंबई : राज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या भागीदारीतून स्मार्ट एमआयडीसी, लघु व मध्यम उद्योगांना चालना दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या बाबत मायक्रोसॉफ्टच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मायक्रोसॉफ्ट ग्लोबलचे उपाध्यक्ष आनंद ईश्वरन आणि भारतातील मुख्य कायर्कारी अधिकारी भास्कर प्रामाणिक यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रुपांतर स्मार्ट एमआयडीसी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
त्याचबरोबर राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना तांत्रिक सहकार्य देऊन त्यांना चालना देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)