योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:41 AM2020-06-22T04:41:14+5:302020-06-22T04:41:33+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांनी योग दिनापासून दूर राहणे पसंत केले.

State Government's lesson to Yoga Day | योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

Next

मुंबई : जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाकडे राज्य सरकारने पाठ दाखवल्याचे रविवारी दिसून आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी योगासने केली आणि त्याचे व्हिडिओदेखील प्रसिद्धी माध्यमांकडे पाठवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांनी योग दिनापासून दूर राहणे पसंत केले.
फडणवीस सरकारच्या काळात योग दिनाचा उत्सव केला जात असे. मंत्रालयात कार्यक्रम आयोजित केला जात असे, पण यावर्षी सरकारी पातळीवर तसे कुठलेही वातावरण नव्हते. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिक्षकेतर कर्मचारी कामावर आहेत. त्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन योग दिन साजरा करावा असे कोणतेही परिपत्रक शिक्षण विभागाने काढले नव्हते. शासकीय कर्मचाऱ्यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानेही काढले नव्हते.

Web Title: State Government's lesson to Yoga Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.