‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 05:56 PM2024-09-29T17:56:34+5:302024-09-29T17:56:38+5:30

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Third Installment: सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगितले जात आहे.

state govt starts to give mukhyamantri ladki bahin yojana third Installment | ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Third Installment: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यातच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल, असे राज्य सरकारने सांगितले होते. त्यानुसार या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती एक्सवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. दिनांक २५ सप्टेंबर रोजी ३४,३४,३८८ भगिनींना १५४५.४७ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

तीन हप्ते एकत्र देण्यात आले आहेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून, दिनांक २६ सप्टेंबर रोजी ३८,९८,७०५ भगिनींना ५८४.८ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, लाकडी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रति महिना १५०० रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही, त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे.   

----००००----
 

Web Title: state govt starts to give mukhyamantri ladki bahin yojana third Installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.