राज्याला पावसाचा इशारा कायम
By admin | Published: April 25, 2016 05:40 AM2016-04-25T05:40:16+5:302016-04-25T05:40:16+5:30
राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात नोंदवण्यात येणारी वाढ कायम असतानाच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे
मुंबई : राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात नोंदवण्यात येणारी वाढ कायम असतानाच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मुंबईत मागील ४८ तासांपासून ढगाळ हवामान आहे.
मागील २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. २५ एप्रिलपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील. २६ एप्रिल रोजी मराठवाड्यात पाऊस पडेल. २७ आणि २८ एप्रिल रोजी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडेल. पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आर्द्रतेमधील वाढीसह उष्णतेत भर पडल्याने उकाड्यामुळे मुंबईकर घामाने हैराण झाले आहेत.