राज्यस्तरीय आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 04:25 PM2019-04-08T16:25:41+5:302019-04-08T16:30:03+5:30

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई)  इयत्ता पहिलीच्या २५ टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी सोडत सोमवारी काढण्यात आले.

State level RTE admission announced | राज्यस्तरीय आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर 

राज्यस्तरीय आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर 

Next
ठळक मुद्देयेत्या दोन दिवसात संगणकीय प्रक्रिया पार पाडली जाणार प्रत्येक शाळेच्या प्रवेशासाठी आलेले अर्ज व उपलब्ध जागा यानुसार संगणकीय पध्दतीने प्रवेश निश्चित होणार

पुणे : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई)  इयत्ता पहिलीच्या २५ टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी सोडत सोमवारी काढण्यात आले. आझम कॅम्पस येथील सभागृहात लहान मुलांच्या हस्ते बाऊलमधून ० ते ९ क्रमांकामधील चिठठया काढण्यात आल्या. पुढील दोन दिवसात या क्रमांकाच्या आधारे प्रत्येक शाळेच्या प्रवेशासाठी आलेले अर्ज व उपलब्ध जागा यानुसार संगणकीय पध्दतीने प्रवेश निश्चित होणार आहेत. 
प्रवेशाची सोडत सोमवारी निघाल्यानंतर त्याआधारे येत्या दोन दिवसात संगणकीय प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर प्रवेशाची यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांनी नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसव्दारे प्रवेश मिळाल्याचे कळविले जाणार आहे. मात्र एखाद्यावेळी मेसेज न मिळाल्यास पालकांनी आरटीईच्या संकेतस्थळावर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची खात्री पालकांनी करून घ्यावी. 
राज्यात एकूण ९ हजार १९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ९२६  जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्धआहेत. तर या जागांसाठी राज्यभरातून तब्बल २ लाख ४६ हजार ३४ अर्ज उपलब्ध झाले आहेत. तर पुण्यात ९६३ शाळांमधून १६ हजार ६०४ जागांसाठी सर्वाधिक ५४  हजार १३९ अर्ज आले आहेत. 

Web Title: State level RTE admission announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.