'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:04 AM2020-02-07T02:04:41+5:302020-02-07T06:22:54+5:30

एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत.

State Minister and Nationalist leader Jitendra Awhad has criticized the BJP | 'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

Next

ठाणे : एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत. विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधीच परस्परांवर कंबरेखालचे वार केले नाहीत. परंतु, राजकारणात काही लोक तोंडावर गोड बोलतात, कौतुक करतात, आपले मित्र असल्याचे भासवतात. मात्र, प्रत्यक्षात ते कंबरेखाली वार करून मोकळे होतात. अशा लोकांमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटते. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना इतके कम्फर्टेबल वाटले नसल्याची जाहीर कबुली आव्हाड यांनी दिली.

मातोश्रीवर एकदा गेलो होतो, तेव्हा ममता, माया व प्रेम काय असते, ते कळले होते, असेही ते म्हणाले. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविली गेली आहे. परंतु, मुंब्य्रातदेखील अशा अनेक अनधिकृत, धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे येथेही ही योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. किंबहुना, एमएमआर रिजनमध्ये क्लस्टर योजना राबविल्यास त्यातून सर्वांनाच हक्काचे घर मिळेल, असे ते म्हणाले.

एसआरएच्या माध्यमातून ठाण्यात ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडा किंवा तत्सम योजनांमध्ये १० टक्के राखीव कोटा ठेवला जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील एसआरएचे नियम समान केले जाणार आहेत. पारसिकनगर येथे २७ एकरचा भूखंड आहे. त्यावर दिवंगत अभिनेत्री नूतन यांचे घर आहे. तिथे पक्षी अभयारण्य, नवा प्रकल्प ठाणेकरांसाठी राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय, गावठाणे आणि कोळीवाड्यांतील रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

एमएमआर रिजनचे वेगळे प्राधिकरण करणार- शिंदे

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरएचा विकास करताना एमएमआर रिजनमध्ये क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. या शिवाय, एमएमआरए क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमावेळी दिली.
च्यानिमित्ताने या भागाचा विकास त्याच ठिकाणी होईल.

धोकादायक किंवा अनधिकृत इमारतींचा विकासही त्याच ठिकाणी होईल. ठाणे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ठाण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. परंतु, ठाणेकरांचा २५ वर्षांपासून विश्वास कायम आहे, असे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका मोठी असली तरी ठाणे महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे क्लस्टरच्या विकासात कोणताही दुजाभाव केला जाणार नसल्याचे शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून स्पष्ट केले.

Web Title: State Minister and Nationalist leader Jitendra Awhad has criticized the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.