भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; राज ठाकरेंची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:52 PM2022-08-25T19:52:08+5:302022-08-25T19:52:34+5:30

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका घेतली आहे. त्याबाबत जनता निर्णय घेईल असं बावनकुळे म्हणाले.

State President Chandrasekhar Bawankule's big statement regarding BJP-MNS alliance; Will meet Raj Thackeray | भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; राज ठाकरेंची भेट घेणार

भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; राज ठाकरेंची भेट घेणार

googlenewsNext

मुंबई - राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला. विधानसभेत मनसेच्या एकमेव आमदारानं सरकारच्या बाजूने मतदान केले. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात जी परिस्थिती समोर येईल तसा निर्णय घेऊ असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी युतीवर अधिक भाष्य करणं टाळलं. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका घेतली आहे. त्याबाबत जनता निर्णय घेईल. जनतेला काय स्वीकारार्ह आहे ते मतपेटीतून समोर येईल. पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाला बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून खूप दूर गेलेत. ४० आमदारांना सोडायला तयार आहेत परंतु सत्ता आणि शरद पवारांना उद्धव ठाकरे सोडत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नवाब मलिकांच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दूर गेलेत हे सिद्ध झाले असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पार्टनर आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात घौडदोड केली तर पुढे बघू. राज ठाकरेंसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंधात राजकारण येत नाही. राज ठाकरेंना मी भेटायला जाणार आहे. प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्यातील जनतेला काय वाटतं हे आम्ही सांगू शकत नाही. मनसेला सोबत घेण्याबाबत आज भाष्य करू शकत नाही. जसजशी परिस्थिती समोर येईल त्यावर निर्णय होऊ शकतो असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

मनसेचं आक्रमक हिंदुत्व भूमिका
गेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या भूमिकेवरून देशासह जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपानं पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर अलीकडेच राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांची थेट पाठराखण केली. जे इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक बोलतो तेच नुपूर शर्मा बोलल्या. त्यात चुकलं कुठे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. 
 

Web Title: State President Chandrasekhar Bawankule's big statement regarding BJP-MNS alliance; Will meet Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.