राज्य गुप्तवार्ता अधिकारी परीक्षेत कॉपी, शेगावात ३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:36 AM2018-07-15T06:36:05+5:302018-07-15T06:37:06+5:30
राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी (एआयओ) या पदासाठी १३ जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी, शेगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाइल फोनद्वारे कॉफी करण्याचा प्रयत्न झाला.
बुलडाणा/खामगाव : राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी (एआयओ) या पदासाठी १३ जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी, शेगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाइल फोनद्वारे कॉफी करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील दोन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक अशा तीन जणांना शेगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना
१६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सूरजसिंग सुपडासिंग हुसिंगे (२३, रा. डावरगाव, ता. बदनापूर, जिल्हा जालना), गोपाल कृष्णा जंजाळ (२७, रा. चिंचपूर, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद)
आणि विलास लक्ष्मण जारवाल (२१, रा. सागरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) अशी त्यांची
नावे आहेत.
बुलडाणा येथील शाहू कॉलेज आणि शेगाव येथील उपरोक्त कॉलेजात या परीक्षेचे केंद्र होते. शेगाव येथील केंद्रावर ९७ पैकी ७२ उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षेच्या तिसऱ्या सत्रात तिघांनी मोबाइलद्वारे संगणकाच्या स्क्रीनवरील फोटो काढून ते व्हॉट्सअॅपद्वारे अन्यत्र पाठवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केंद्रावरील परीक्षा अधिकाºयांच्या लक्षात येताच, त्यांनी त्वरित तिघांचेही मोबाइल जप्त व संगणक बंद करून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.