राज्य सेवा पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:52 PM2017-07-21T22:52:50+5:302017-07-21T22:52:50+5:30

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत दि. २ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पुर्व) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

State Service Pre-Examination Result | राज्य सेवा पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य सेवा पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत दि. २ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पुर्व) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ उमेदवार पात्र ठरले आहेत.
आयोगामार्फत संकेतस्थळावर पात्र उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व परीक्षेच्या गुणांचे कटआॅफ प्रसिध्द करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा दि. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक पुणे केंद्रातून परीक्षा दिलेल्या २ हजार ६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुर्व परीक्षेच्या निकालामध्ये खुला गटाचे गुणांचे कटआॅफ १८९, अनुसुचित जाती १७३, अनुसूचित जमाती १४८ तर इतर मागासवर्ग प्रवर्गाचे १८९ गुणांचे कटआॅफ असल्याचे आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
-------------
प्रवर्गनिहाय कटआॅफ
खुला - १८९
एससी - १७३
एसटी - १४८
डीटी (ए) - १८०
एनटी (बी) - १८४
एसबीसी - १८२
एनटी (सी) - १८९
एनटी (डी) - १८९
ओबीसी - १८९

Web Title: State Service Pre-Examination Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.