शिरपूर पॅटर्न राज्यात
By admin | Published: November 5, 2014 04:14 AM2014-11-05T04:14:42+5:302014-11-05T04:14:42+5:30
जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाणार असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी दाखविल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली.
जळगाव : जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाणार असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी दाखविल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली.
खडसे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे कुणा शेतकऱ्याला किंवा इतरांना शेताजवळ, नाल्यावर पाणी अडवायचे असल्यास विनाअट परवानगी दिली जावी, असा निर्णय झाला. तसा आदेश लवकरच काढला जाईल, असे ते म्हणाले.
पाणी अडविणाऱ्यांना शासनही मदतीचा हात देईल. यंत्रणा किंवा इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जलसंधारणासाठी गाळ काढण्याची मोहीम गतीमान होईल़ यासाठी कुणालाही तलाव, नाले व प्रकल्पांमधील गाळ काढता येईल. शेतीसह कुंभारमंडळी किंवा इतरांना त्या गाळाचा वापर करता येईल. लहान बंधाऱ्यांचे खोलीकरण केले जाईल, अशी माहिती खडसे यांनी दिली़ (प्रतिनिधी)