एसटी कात टाकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:39 AM2019-02-25T00:39:25+5:302019-02-25T00:39:29+5:30

प्रवाशांच्या मनोरंजनासाठी वायफाय : सीसीटीव्हीची चोख सुरक्षा

state transport updating | एसटी कात टाकतेय

एसटी कात टाकतेय

Next

- चेतन ननावरे 

मुंबई : राज्यात १९६० साली सुरू झालेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी सेवा आता अद्ययावत होऊ लागली आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता माल वाहतुकीच्या क्षेत्रातही उतरली आहे़ आगारांसह बस थांबे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी व मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी एसटीला बराच लांबचा पल्ला गाठायची गरज आहे.


साध्या लाल डब्याची एसटी आता निम आराम सेवेपासून स्लीपर कोचपर्यंतच्या वातानुकूलित सेवा पुरवत आहे. याशिवाय प्रवाशांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक एसटीमध्ये वायफायची सुविधा देण्यात आली आहे. आवडेल तिथे प्रवाससारख्या विविध सेवांसह एसटीकडून विविध २४ सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. सेवा म्हणून तोट्यातील मार्गही चालवल्याने एसटीचे कंबरडे मोडू लागले आहे.
१९६० साली बांधलेल्या मुंबई सेंट्रल आगाराचे महत्त्व आता तुलनेने कमी झाले आहे. तुलनेने परळ, कुर्ला-नेहरूनगर आणि बोरीवलीतील सुकुरवाडी व नॅन्सी कॉलनी ही बसस्थानके व आगारे मुंबईतील एसटी वाहतुकीची प्रमुख स्थानके आहेत. या ठिकाणांमधून एसटी बसेसच्या रोज २ हजार ५६७ फेºया होत असून सरासरी ६९ हजार प्रवासी रोज या माध्यमातून प्रवास करतात.


स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष
स्तनदा माता असलेल्या प्रवाशांची अडचण ओळखून प्रशासनाने चारही ठिकाणी अद्ययावत हिरकणी कक्षाची उभारणी केली आहे. जेणेकरून कोणत्याही स्तनदा मातेला स्तनपानासाठी अवघडलेल्या अवस्थेत बसण्याची गरज भासणार नाही.


मुंबईत होणार १४ बसस्पॉट
दादरच्या पार्श्वभूमीवर मैत्री पार्क, वाशी असे एकूण १४ बसस्पॉट अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये प्रवाशांच्या आसनव्यवस्थेसह बुकिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.


पिवळ्या रंगात रंगणार स्थानके
राज्याप्रमाणेच मुंबईतील एसटी स्थानकांना पिवळ्या आणि गडद तपकिरी रंगाचा साज चढणार आहे. त्यामुळे एसटी स्थानकांची वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

चोरट्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मुंबईतील आगार व बसस्थानकांत एकूण ५५ सीसीटीव्ही लावले आहेत. त्यातील मुंबई सेंट्रलमध्ये २१, परळमध्ये १६, कुर्ला नेहरूनगरमध्ये १४ आणि नॅन्सी कॉलनी स्थानकावर ४ सीसीटीव्ही कार्यरत आहेत. या सर्व सीसीटीव्हींचे कंट्रोल रूम हा आगार प्रमुखांकडे ठेवण्यात आला आहे. जेणेकरून कोणत्याही घटनेवर करडी नजर ठेवता येईल.

शौचालयांची संख्या वाढतेय
एसटी आगारांमध्ये असलेल्या शौचालयांमध्ये प्रवाशांशिवाय सर्वसामान्य नागरिकांनाही जाता येते. आगाराशेजारील वस्तीमधील कार्यालयांतील कर्मचाºयांपासून स्थानिकांपर्यंत बहुतेक जण आगारांमधील शौचालयाचा वापर करतात. म्हणूनच प्रत्येक आगारामधील शौचालयांची संख्या वाढवण्याचे काम सुरू आहे.

‘आवडेल तेथे प्रवास’
ही योजना १९८८ पासून प्रवाशांसाठी एसटी राबवत आहे. या योजनेअंतर्गत ७ दिवसांच्या पासाप्रमाणे ४ दिवसांचा पास माफक दरात दिला जातो. प्रवाशांच्या गरजेप्रमाणे या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. पूर्वी एकाच प्रकारच्या सेवेच्या पासाचे मूल्य पुढील वाढ होईपर्यंत एकच ठेवण्यात येत असे. २२ सप्टेंबर २००३ पासून पासाच्या मूल्यासाठी २ हंगाम ठेवण्यात आलेले आहेत. त्यात १५ आॅक्टोबर ते १४ जून हा कालावधी गर्दीचा हंगाम मानला जातो. तर १५ जून ते १४ आॅक्टोबर हा कमी गर्दीचा हंगाम समजला जातो. या दोन्ही कालावधीत पासचे दर वेगवेगळे असतात.


मुंबईत एसटीकडून
देण्यात येणाºया सेवा
साधी सेवा, जलद सेवा, रात्र सेवा, निमआराम सेवा हिरकणी, वातानुकूलित सेवा (दादर-पुणे मार्गावर), व्होल्वो वातानुकूलित (शिवनेरी), भाडेतत्त्वावरील वातानुकूलित (शिवनेरी), भाडेतत्त्वावरील शिवनेरी स्लिपर कोच, यशवंती (मिडी) सेवा, निमआराम वातानुकूलित सेवा-शीतल (दादर-पुणे मार्गावर), निमआराम बसेस (हिरकणी)

Web Title: state transport updating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.