राज्यात जिथे शक्य तिथेच युती - दानवे

By admin | Published: January 24, 2017 04:16 AM2017-01-24T04:16:42+5:302017-01-24T04:16:42+5:30

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिथे शक्य होईल तिथे युती करण्यात येईल, असे भाजपाचे

In the state where there is possible alliance - Danwe | राज्यात जिथे शक्य तिथेच युती - दानवे

राज्यात जिथे शक्य तिथेच युती - दानवे

Next

पुणे : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिथे शक्य होईल तिथे युती करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. भाजपाला शिवसेनेशी युती करायची असेल तर पूर्ण राज्यात करावी लागेल अशी शिवसेनेकडून मांडण्यात आलेली भूमिका दानवे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. त्याचबरोबर युतीबाबत बोलताना वाट कुणी कुणाची पाहत नाही, वाट पाहण्यात फसवेगिरी होते, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शहरातील सर्व खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दानवे म्हणाले, राज्यातील १० महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यानुसार त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहे. जिथे युती होईल तिथे एकत्र लढून युती न झाल्यास स्वबळावर लढू.
पुण्यामध्ये युतीची चर्चा सुरू आहे, कुठेही युतीचे गाडे अडलेले नाही. योग्यवेळी युतीचा निर्णय जाहीर केला जाईल असे दानवे यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेकडे ११४ जागा मागितल्या आहेत, त्यानुसार त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला, मात्र यामुळे युतीमध्ये अडसर निर्माण व्हायला नको अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.
अनेक ठिकाणी गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याबाबत दानवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही कुठल्याही गुंडाला पक्षात प्रवेश दिला नाही. इतर कार्यकर्त्यांसोबत काहीजण येऊन पक्षाचा शेला घालून घेत असतील तर त्याला पक्षप्रवेश म्हणता येणार नाही. कुठल्याही गुंडाला पद व तिकिट दिले जाणार नाही.’’
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा सविस्तर आढावा प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. प्रत्येक आमदार व पदाधिकाऱ्याचे निवडणुकीच्या तयारीविषयी मत या वेळी ऐकून घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: In the state where there is possible alliance - Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.