पेट्रोल-डिङोल वितरकांचा 11 ऑगस्टला राज्यव्यापी बंद
By admin | Published: August 6, 2014 02:04 AM2014-08-06T02:04:04+5:302014-08-06T02:04:04+5:30
पेट्रोल व डिङोलवरील एलबीटी कराच्या विरोधात इंधन विक्रेत्यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे.
Next
नवी मुंबई : पेट्रोल व डिङोलवरील एलबीटी कराच्या विरोधात इंधन विक्रेत्यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. राज्यातील महापालिका हद्दीत एलबीटीचे दर कमी करून ते समान पातळीवर आणावेत, या मागणीसाठी मुंबई वगळता राज्यातील सर्व पेट्रोल व डिङोल वितरकांनी 11 ऑगस्ट रोजी एकदिवसीय संप पुकारला आहे.
महाराष्ट्रातील महापालिकांकडून पेट्रोल व डिङोलवर मनमानी पद्धतीने एलबीटी वसूल केला जातो. हा कर 2 ते 5 टक्के इतका आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत पेट्रोलचे दर प्रति लिटर दोन ते चार रुपयांनी महाग आहे. याचा फटका पेट्रोल व डिङोलच्या विक्रीवर झाला आहे. कारण वाहनधारक पैसे वाचविण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रबाहेरील पेट्रोल पंपांवर जाऊन इंधन घेणो पसंत करतात.
या प्रकारामुळे 26 महापालिका कार्यक्षेत्रतील जवळपास एक हजार पेट्रोलपंपांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्रात एकच करप्रणाली लागू करावी, पेट्रोल व डिङोलवरील एलबीटी 0.1 इतका करावा, डिङोलवरील व्हॅटचा दर 3 टक्क्यांनी कमी करून इतर राज्यांच्या तुलनेत समान दर ठेवावेत, या मागण्यांसाठी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुस:या दिवशी सकाळी सहा वाजेर्पयत बंद पुकारण्यात आल्याची माहिती प्रभात सिंग यांनी दिली. (प्रतिनिधी)