राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट पण त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करु - मुख्यमंत्री
By admin | Published: December 16, 2015 05:37 PM2015-12-16T17:37:20+5:302015-12-16T17:37:20+5:30
राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट उभे राहिलेल आहे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुष्काळ, शेतकर्यांचे प्रश्न या विषयावर झालेल्या चर्चेला विधानसभेत मुख्यमंत्री उत्तर देत होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ - राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट उभे राहिलेल आहे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुष्काळ, शेतकर्यांचे प्रश्न या विषयावर झालेल्या चर्चेला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे राज्यावर हे संकट उभे ढाकले आहे. जलसंपदा योजणा वेळेवर राबवली असती तर राज्यावर ही वेळ आली नसती असा टोला मुख्यमंत्र्यानी विरोधकाला लगावला.
शेतीतील गुंतवणूक वाढवली पाहिजे, नव्या आर्थिक वर्षात ८२.२७ लाख शेतकरी विम्याच्या कक्षेत आले आहेत तर ६१,२३,२५९ शेतकरी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत १ लाख मेट्रिक टनाहून अधिक धान्य वाटप करण्यात आले आहे. राज्यातील ६२०० गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या विविध कामांच्या माध्यमातून २४ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला, आत्ता जलयुक्त शिवार अंतर्गत आमदारांच्या अध्यक्षतेत तालुका पातळीवर समित्या स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगीतले.
राज्यावर दुष्काळाचं संकट आलेल आहे, मराठवाड्यात फक्त १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यातील ४० हजार जणावरं छावण्यात आहेत. तर साडेसात लाख विद्यार्थ्यांचं शालेय शुल्क माफ केलं आहे. यापूर्वी केवळ १ लाख रूपये नुकसानभरपाई पोटी मिळायचे आता त्याऐवजी २ लाख रूपये मिळणार आहेत . सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ मिळत आहे. गेल्यावर्षीपेक्षा कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ६.५ लाखांची वाढ झाली असून कर्जाच्या रकमेत ४१२९ कोटी रुपयांची वाढ झाल्याच त्यांनी हिवाळी अधिवेशनातील दुष्काळ, शेतकर्यांचे प्रश्न या विषयावर झालेल्या चर्चेला सांगीतले.
मुख्यमंत्र्याच्या भाषणातील ठळक मुद्दे -
- राजीव गांधी जीवनदायी योजना जाहीर केल्यापासून आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये २४११८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला
- गेल्या वर्षांत ४९ हजार विहिरी बांधण्यात आल्या. यापूर्वी केवळ एका वर्षात १६ हजार विहिरी बांधल्या जायच्या
- आता मागेल त्याला शेततळे
- जलयुक्त शिवारसाठी आणखी ५००० गावांची निवड करण्यात आली, जनसहभाग देणाऱ्या गावांचा आणखी समावेश करणार
- सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ
- परीक्षा शुल्क माफी यातून शेतकरी कुटुंबातील सुमारे ९.५ लाख विद्यार्थ्यांना ४० कोटींचा दिलासा मिळाला आहे
- दुष्काळ कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट दिल्याने १९,४५,१२३ शेतकरी लाभार्थी,सुमारे ३५३ कोटी रूपये लाभ दिला