राज्यातील कांदा पंजाब, दिल्लीला जाणार! दिल्ली सरकारसोबत चर्चा- सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:26 AM2017-09-26T02:26:48+5:302017-09-26T02:26:58+5:30
राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा चांगली असून सध्याची मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तो इतर राज्यात विशेषत: पंजाब व दिल्लीत पाठविण्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.
मुंबई : राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा चांगली असून सध्याची मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तो इतर राज्यात विशेषत: पंजाब व दिल्लीत पाठविण्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतक-यांना चांगले दामही मिळणार आहे.
इतर राज्यात कांदा निर्यात करण्याबाबत मंत्रालयातील दालनात पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाºयांसोबत खोत यांनी सोमवारी बैठक घेतली. देशभरात कांदा पाठविण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी व कांदा उत्पादक यांचे १० जणांचे शिष्टमंडळ तयार करावे. शासकीय पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याची आवक-जावक, कांदा साठविण्यासाठी लागणारे गोदाम, बाजारभाव, लहान व्यापाºयांबाबत माहिती घ्यावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
प्रायोगिक तत्वावर कांदा निर्यात करण्यासाठी १० ट्रक भाड्याने घेणे व पंजाब बाजार समितीमध्ये गोदाम घेण्यासाठी पणन मंडळाने तरतूद करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
दिल्ली सरकारसोबत चर्चा
दिल्लीला कांदा महाग मिळतो. दुसरीकडे राज्यातील शेतकºयांना मात्र दलालांमुळे अपेक्षित भाव मिळत नाहीत. दिल्ली शासनाची धान्य व इतर साहित्य विक्र ीसाठी रेशन दुकाने आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील कांदा तेथे विक्र ी करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी पणन मंत्रालय चर्चा करणार आहे. बैठक घेण्यासाठी सदाभाऊंनी केजरीवाल यांना पत्र पाठविले आहे.