राज्याला बसला अवकाळी फटका

By Admin | Published: March 16, 2015 02:48 AM2015-03-16T02:48:49+5:302015-03-16T02:48:49+5:30

विदर्भात नागरपूरसह चार जिल्ह्यांना रविवारी गारपिटीचा तडाखा बसला असून, अनेक भागांत गारांचा खच पडला होता; तर खान्देश, सांगली व पंढरपूरला

The state will sit in the near future | राज्याला बसला अवकाळी फटका

राज्याला बसला अवकाळी फटका

googlenewsNext

मुंबई : विदर्भात नागरपूरसह चार जिल्ह्यांना रविवारी गारपिटीचा तडाखा बसला असून, अनेक भागांत गारांचा खच पडला होता; तर खान्देश, सांगली व पंढरपूरला अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे द्राक्षे, संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, मिरची, सूर्यफूल, जवस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, नागपूरच्या उमरेड तालुक्यातील गौरी गणेशपूर येथे प्रभाकर मणिराम तेलरांधे (४७) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.
नागपूर शहरासह हिंगणा, काटोल व कळमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली़ यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव, दराटी, जेवली व अन्य गावांमध्ये सुमारे अर्धा तास गारपीट झाली तर शहरात सरी कोसळल्या. धामणगाव तालुक्यालाही अवकाळी गारपिटीचा फटका बसला.

Web Title: The state will sit in the near future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.