राज्यात एकाच दिवशी 3 हजार बंधा:यांचे लोकार्पण
By admin | Published: August 8, 2014 01:28 AM2014-08-08T01:28:46+5:302014-08-08T01:28:46+5:30
राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आलेल्या 3 हजार 87 सिमेंट नालाबंधा:यांचे लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणार आहे.
Next
>मुंबई : राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आलेल्या 3 हजार 87 सिमेंट नालाबंधा:यांचे लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणार आहे. जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. या बंधा:यांद्वारे 33 हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल. पहिल्या टप्प्यात वर्षभरापूर्वी 143 कोटी रुपये खचरून 1 हजार 423 बंधारे बांधण्यात आले होते. त्याद्वारे 15 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती.
मोठय़ा सिंचन प्रकल्पांवर प्रचंड निधी खर्च करण्याऐवजी पावसाचे पाणी अडविणारे नाला किंवा बंधारे बांधून तत्काळ सिंचन सुविधा उपलब्ध करून देता येते, हे या लहान बंधा:यांच्या निर्मितीतून सिद्ध झाले आहे. पहिल्या टप्प्यातील बंधा:यांचा फायदा दुष्काळग्रस्त भागाला मोठय़ा प्रमाणात झाला होता.
या बंधा:यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे, आधी बांधलेले बंधारे आणि आताचे बंधारे या सर्वाचे त्रयस्थ संस्थेमार्फत अंकेक्षण करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)