पवारांसंदर्भातील मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य सातारकरांच्या जिव्हारी ? गर्दीतून दिले उत्तर !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:42 AM2019-09-23T11:42:00+5:302019-09-23T11:43:36+5:30
शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. नवी पिढी आमच्यासोबत का आहे ? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते.
मुंबई - अनेक वर्षे सत्ता उपभोगणारे आणि सत्तेच्या लालसेने राष्ट्रवादी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात सामील होणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहेत. तसेच सत्ताधारी पक्षाकडून शरद पवारांवर करण्यात येत असलेले आरोप राष्ट्रवादीसाठी नवसंजीवनी ठरत असून सहानुभुतीची लाट तयार होऊ लागली आहे. त्याची प्रचिती सातारा येथील शरद पवारांच्या भेटी दरम्यान पाहायला मिळाली.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. असं असताना पवारांना सातारा दौरा केला. या दौऱ्यात गर्दी जमणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र सगळ अनपेक्षितच घडलं.
शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. नवी पिढी आमच्यासोबत का आहे ? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते. एकूणच पवारांचे राजकारण संपल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.
दरम्यान पवारांच्या समर्थकांना अर्थात साताऱ्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य रुचलेल दिसन नाही, हे पवारांच्या सातारा भेटीत स्पष्ट झाले. उदयनराजे सारखे नेते सोडून गेले असताना पवारांच्या साताऱ्यातील सभेला मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पवारांवर असलेले प्रेम आणि त्यांच्याविषयीच्या सहानुभूतीमुळे तसेच पवारांना संपविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांना उत्तर देण्यासाठी होती, असही गर्दीतील लोकांनी सांगितले.