राज्यातील महाविद्यालये येणार ‘बाटू’च्या नियंत्रणात
By admin | Published: November 4, 2016 05:07 AM2016-11-04T05:07:54+5:302016-11-04T05:07:54+5:30
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) संलग्न होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली
माणगाव (रायगड) : राज्यातील महाविद्यालये रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) संलग्न होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी मुदतवाढ देत तारीख २२ नोव्हेंबर ही संलग्न होण्याची अंतिम तारीख आहे.
लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वास्तुशास्त्र परिषद व औषधनिर्माणशास्त्र परिषद आदींच्या अखत्यारीतील अभ्यासक्र म राबवणारी पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये संलग्न होणार आहेत. महाविद्यालये संलग्नीकरणाचा शासन निर्णय ३१ जानेवारी २०१४ ला प्रसिद्ध केला होता. महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. राज्यातील सर्व तंत्रशास्त्र महाविद्यालये लोणेरे येथील या ‘बाटू’शीसंलग्न करण्याच्या, तसेच विद्यापीठाची चार केंद्रे व पाच उपकेंद्रे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. (वार्ताहर)
> तज्ज्ञांच्या विभागीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. ई-गव्हर्नस पद्धत सुरू करणार आहोत. पहिल्या वर्षासाठी किमान शंभर महाविद्यालये संलग्न होण्याची शक्यता आहे.
- डॉ. विलास गायकर,कुलगुरू,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
कार्यकारी परिषद, विद्वत परिषद अशा प्राधिकरणांची निर्मिती तसेच या सर्व प्राधिकरणावर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची सदस्य म्हणून नेमणूक करण्याची प्रक्रि या पूर्ण झाली आहे.
- डॉ. अरविंद किवळेकर,
प्र. कुलसचिव