राज्यात जीएसटी विधेयकाला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

By admin | Published: May 9, 2017 11:13 PM2017-05-09T23:13:07+5:302017-05-09T23:13:07+5:30

राज्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे

State's Green Lantern of the GST Bill | राज्यात जीएसटी विधेयकाला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

राज्यात जीएसटी विधेयकाला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - राज्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. आता 17 मे रोजी होणा-या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात जीएसटी आणि इतर संबंधित विधेयके मंजुरीसाठी मांडले जातील. विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यामुळे आता लवकरच जीएसटी कायदा राज्यात लागू केला जाईल.

केंद्र सरकारने जीएसटी आणि त्यासंबंधीची अन्य विधेयके संसदेत मंजूर करून घेतली आहेत. 1 जुलै 2017 पासून देशात जीएसटी लागू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्यासाठी राज्यांनाही स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. 
 
विरोधकांनी वस्तू आणि सेवा कराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली असतानाच सत्ताधारी भाजपने शिवसेनेचा पाठिंबा मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांनी जीएसटीवरून सरकारला इशारा दिला होता.

Web Title: State's Green Lantern of the GST Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.