नाका कामगारांसाठी राज्यव्यापी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:16 AM2017-12-01T04:16:53+5:302017-12-01T04:17:15+5:30

नाका कामगारांसाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या असूनही त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

 Statewide campaign for Naka workers | नाका कामगारांसाठी राज्यव्यापी अभियान

नाका कामगारांसाठी राज्यव्यापी अभियान

Next

मुंबई : नाका कामगारांसाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या असूनही त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. परिणामी, नाका कामगारांमध्ये हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी १ डिसेंबर ते २ जानेवारी २०१८ दरम्यान राज्यव्यापी जनजागृती अभियान राबवण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश राठोड यांनी केली आहे.
राठोड म्हणाले की, नाका कामगार योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी कामगारांची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कामगार नोंदणीच्या संख्येत वाढ होण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेतलेले आहे. ३ जानेवारीला या अभियानाचा समारोप मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.

Web Title:  Statewide campaign for Naka workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.