आज समृद्धी महामार्गाविरोधात राज्यव्यापी लढा

By Admin | Published: April 26, 2017 02:06 AM2017-04-26T02:06:07+5:302017-04-26T02:06:07+5:30

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने

Statewide fight against Samrudhi highway today | आज समृद्धी महामार्गाविरोधात राज्यव्यापी लढा

आज समृद्धी महामार्गाविरोधात राज्यव्यापी लढा

googlenewsNext

भातसानगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने चालविलेल्या अत्याचाराविरोधात उद्यापासून राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी केला आहे. याची सुरूवात शहापूर येथील मुंबई-नाशिक चेरपोली येथे महामार्गावर चक्काजाम करून होणार असून राज्यभरातील हजारो शेतकरी
सकाळी ११ वाजल्यापासूनच सहभागी होणार असल्याचे संघर्ष समितीचे निमंत्रक विश्वनाथ पाटील स्पष्ट केले.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास होण्याचा दावा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढून हा प्रकल्प पुढे नेण्याचे षडयंत्र चालविले आहे. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांची आवश्यक ती जमीन लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नव्हे तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास विरोध केला आहे. वार्ताहर)

Web Title: Statewide fight against Samrudhi highway today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.