उद्यापासून पेट्रोलपंप धारकांचे राज्यव्यापी आंदोलन
By admin | Published: November 2, 2016 06:45 PM2016-11-02T18:45:44+5:302016-11-02T18:45:44+5:30
ट्रोलियम डिलर्सच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ या दुर्लक्षपणामुळे पेट्रोल डिलर्सचे नुकसान होत आहे़ या शासनाच्या विरोधात उद्यापासून
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 02 - पेट्रोलियम डिलर्सच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ या दुर्लक्षपणामुळे पेट्रोल डिलर्सचे नुकसान होत आहे़ या शासनाच्या विरोधात उद्यापासून (३ व ४ नोव्हेंबर रोजी)पेट्रोल खरेदी न करण्याचा, ५ नोव्हेबर रोजी फक्त एकाच शिफ्टमध्ये विक्री करण्याचा तर ६ नोव्हेंबर पासून रविवार व बँक हॉलीडेजच्यास दिवशी सर्वच व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे-देशमुख व फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अपूर्वचंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल डिलर्सच्या अडचणीबाबत कमिटी गठीत करण्यात आली होती़. या समितीचा अहवाल येथुन ३ वर्ष झाला तरी कार्यवाही झाली नाही. सध्या डिझेलला १ रूपया ४८ पैसे तर पेट्रोलला २ रूपये ४५ पैसे इतके कमिशन मिळते.पेट्रोलपंपाचा व्यवस्थापन खर्च, कायदे नियम, सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत अपुरे असून व्यवसाय चालविणं कठीण झालं आहे, असेही संजय ताटे-देशमुख यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा पेट्रोलपंप डिलर असोसिएशनं आपल्या अडचणी सरकारच्या तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. मात्र या आंदोलनाकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ पेट्रोल पंपधारकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. यापुढे कमिशनवाढीचा निर्णय न झाल्यास पेट्रोलपंप चालक आपल्या खर्चात बचत म्हणून रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी पंपावरील व्यवहार बंद ठेवणार आहेत़ २९ आॅक्टोबरला डिलर्सनी पंपावर ब्लॅक आऊटचं आंदोलन केलं मात्र पुढे सामन्य ग्राहकास आंदोलनाचा त्रास होवू नये यासाठी पंपावरील सेवा सुरळीत ठेवल्या.
या पत्रकार परिषदेस महेंद्र डोंगरे, केदारनाथ बावी, निखिल केंगनाळकर, प्रकाश हत्ती आदी पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.