प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन
By admin | Published: March 30, 2017 10:06 PM2017-03-30T22:06:54+5:302017-03-30T22:06:54+5:30
माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 30 - माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती पूर्णपणे देण्यास टाळाटाळ केल्याने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अधिकारी जोपर्यंत पूर्णपणे माहिती देत नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा बर्मन यांनी दिला आहे.
अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणा-या पाण्यावर प्रकिया न करताच थेट वालधुनी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. महापालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प आणि आनंदनगर औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद होता. तरी देखील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात होते. प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारखानदारांवर काय कारवाई केली. त्याचबरोबर गुजरातच्या पर्यावरण सुरक्षा संस्थेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 2012 रोजी दिलेल्या सुनावणीनुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात यावी, असा देशव्यापी निकाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी सहा महिन्यांच्या आत केली जावी, असे न्यायालयाने सूचित केले होते. त्यानुसार काय अंमलबजावणी केली. याचाही जाब बर्मन यांनी माहितीच्या अधिकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयास विचारला होता.
6 मार्चला माहिती अधिकाराचा अर्ज स्वत: भेटून बर्मन यांनी कार्यालयास सादर केला होता. त्यावर 22 मार्च रोजी माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले. त्यांना अर्धवट माहिती दिली गेली. उर्वरीत माहितीसाठी त्यांना पुन्हा कार्यालयात प्रत्यक्ष येण्यास सांगितले. ते सोमवारी कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना माहितीच्या अधिकारीतील माहितीची फाईल पाहून घ्या. ङोरॉक्स मशीन खराब आहे. प्रदूषणास जबाबदार असलेल्या कोणत्या कारखान्यांना कारखाना बंद करण्याची नोटिस बजावली आहे. त्याची माहिती बर्मन यांना हवी होती. हीच माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने बर्मन यांनी माहिती आत्ताच द्या अन्यथा कार्यालय सोडणार नाही. बर्मन यांनी कार्यालयात ठिय्या दिला आहे. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.