सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला
By Admin | Published: June 15, 2017 08:03 PM2017-06-15T20:03:55+5:302017-06-15T20:03:55+5:30
हिंदू देवतांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुतळयाला जोडे मारून आणि पुतळा जाळून
ऑनलाइन लोकमत
सिल्लोड(औरंगाबाद), दि. 15 - हिंदू देवतांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुतळयाला जोडे मारून आणि पुतळा जाळून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर हिंदू जागरण मंचच्या वतीने गुरुवारी एक तास निदर्शने व आंदोलन करण्यात आली. अब्दुल सत्तार मुर्दाबाद... त्यांना अटक करा.. हिंदू देवतांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.. तसेच शहर पोलिस ठाण्यात सुद्धा गुन्हे दाखल करा या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात एक तास गोंधळ घातला होता.
ग्रामीण पोलिस ठाण्यात आ. विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे. पुन्हा शहर पोलिस ठाण्यात तोच गुन्हा दाखल करता येणार नाही..त्याच गुह्यात आपले स्टेटमेंट घेतले जातील असे आश्वासन पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी दिल्याने निदर्शन कर्त्यानी निदर्शन मागे घेतले. मात्र आ. अब्दुल सत्तार यांना अटक केली नाही तर शिवसेने तर्फे आज शुक्रवारी रास्ता रोको व
शनिवारी हिंदू जागरण मंच , भाजप, शिवसेना यांनी सिल्लोड शहर बंद करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
दहिगाव तालुका सिल्लोड येथे जमिनीच्या वादातुन आ. अब्दुल सत्तार यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ करतांना समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान ब्रम्हचारी हनुमान यांचे नाव घेऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे सर्व हिंदू बांधवांनी आज गुरुवार (दि.१५) रोजी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर एकत्रीत येऊन आ.अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदविला. त्यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी आ.सांडू पाटील लोखंडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे,माजी तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर,कमलेश कटारिया,विनोद मंडलेचा,हिन्दू जागरण समितीचे अध्यक्ष मनोज मोरेल्लू, कारखान्याचे माजी चेरमन श्रीरंग साळवे, पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तायडे, शिवसेनेचे गटनेता नगरसेवक सुनिल मिरकर, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल,,अनिल खरात, रघुनाथ घरमोडे, सुनिल काळे, शामराव आळणे, विजय वानखेडे, विठठल वानखेडे,मच्छींद्र धाडगे, शिवा टोम्पे, मकरंद कोर्डे सहित शेकडो नागरिकांनी निदर्शन आंदोलन करुण आ अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला.
शिवसेनेचा सिल्लोड येथे आज रास्ता रोको...
आ. अब्दुल सत्तार यांना 12 तासाच्या आत अटक केली नाही तर सिल्लोड शहरातील आम्बेडकर चौकात शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवसेने तर्फे रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निदर्शन करण्यात येईल असे निवेदन शेवसेनेतर्फे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख यांना गुरुवारी देण्यात आले. या निवेदनावर गटनेता सुनील मिरकर, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख मछिंद्र घाडगे, राजेंद्र क्षीरसाठ, प्रवीण मिरकर, रवी रासने, शिवा टोम्पे, कैलास वराडे, संजय बड़क, गोपाल मंडावत यांच्या सह्या आहेत.
शनिवारी हिंदुत्व वादी संघटने कडून सिल्लोड बंदची हाक....
या प्रकरणी आ अब्दुल सत्तार यांना अटक करावी या मागणी साठी हिंदुत्व वादी संघटने तर्फे शनिवारी दी 17 रोजी सिल्लोड शहर बंद ची हाक देण्यात आली असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी दिली.(फोटो)