अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं ६ दिवसांत दोनदा अनावरण होणार; शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 11:34 AM2021-03-07T11:34:45+5:302021-03-07T12:12:49+5:30

वर्षभरापासून अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण रखडलं; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

statue of ahilyadevi holkar will be unveiled twice in 6 days by shiv sena and bjp | अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं ६ दिवसांत दोनदा अनावरण होणार; शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपणार?

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं ६ दिवसांत दोनदा अनावरण होणार; शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपणार?

googlenewsNext

हिंगोली: औंढा नागनाथमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा आमनेसामने आले आहेत. गेल्या वर्षभरापासून अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं लोकार्पण रखडलं आहे. आता शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी लोकार्पणाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. (statue of ahilyadevi holkar will be unveiled twice in 6 days by shiv sena and bjp)

अनेक मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार करून हिंदू संस्कृती अबाधित ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा हिंगोलीतल्या औढा नागनाथ ट्रस्टनं उभारला आहे. पण या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) गेल्या वर्षभरापासून वेळ मिळालेला नाही. ते बहुधा माझं कुटुंब माझी जबाबदारी यात व्यस्त आहेत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी लगावला.



मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकर

महापराक्रमी मल्हाररावजी होळकर यांची जयंती १६ मार्चला आहे. या दिवसांचं औचित्य साधून दुपारी १ वाजता अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक व्हावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं.

'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार

शिवसेना ११ मार्चला अनावरण करणार
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण ११ मार्च रोजी करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध भूषण होळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिली. ते म्हणाले, आधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्याचं ठरलं होतं. मात्र कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. या पुतळ्याचं अनावरण लवकर व्हावं ही समाजाची भावना लक्षात घेता महाशिवरात्रीच्या दिवशी हे अनावरण होणार आहे.

पडळकरांनी लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना पत्र
अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणास होत असलेल्या विलंबाबद्दल गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. 'बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत मंदिर समितीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पण हा पुतळा गेल्या वर्षभरापासून लोकार्पणापासून वंचित आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे,' असं पडळकर यांनी पत्रात म्हटलं होतं.

'अहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. किरकोळ श्रेयवादासाठी लोकार्पण वर्षभर थांबवणं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान केल्यासारखं आहे. येत्या पंधरा दिवसात या पुतळ्याचं अनावरण करावं. अन्यथा पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर श्रद्धा असणारे भक्त व समस्त समाज बांधवांच्या हस्ते भूषणसिंहराजे होळकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल,' असा इशारा पडळकर यांनी दिला होता.

Web Title: statue of ahilyadevi holkar will be unveiled twice in 6 days by shiv sena and bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.