पुतळा शिवाजी महाराजांचा नव्हेतर राजा दहिरसेनचा; उल्हासनगरातील त्या पुतळ्याची होणार स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:08 PM2021-08-23T19:08:20+5:302021-08-23T19:08:54+5:30
गांधी रोड परिसरातील त्या पुतळ्याची स्वच्छता सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व समाजसेवक २५ ऑगस्ट रोजी सिंधी राजा दहिरसेन यांच्या जयंती दिनी होणार असल्याची माहिती समाजसेवक शशिकांत दायमा यांनी दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : गांधी रोड परिसरातील त्या पुतळ्याची स्वच्छता सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व समाजसेवक २५ ऑगस्ट रोजी सिंधी राजा दहिरसेन यांच्या जयंती दिनी होणार असल्याची माहिती समाजसेवक शशिकांत दायमा यांनी दिली. तसेच पुतळा शिवाजी महाराज यांचा नव्हेतर सिंधी राजा दहिरसेन यांचा असल्याची माहिती जुने जाणते नागरिक देत असल्याची माहिती दिली.
उल्हासनगरचा ८ ऑगस्ट रोजी ७२ वा वर्धापन दिवस धुमधडाक्यात साजरा झाला. शहराच्या स्थापने नंतर कॅम्प नं-५ येथील गांधी रोड परिसरात शिवाजी महाराज यांचे साम्य असलेला पुतळा उभा आहे. पुतळ्याची दुरावस्था झाल्याची चर्चा रंगल्यावर, शिवसेनेसह मनसे, सामाजिक संस्था पुढे येऊन पुतळ्याची दुरुस्ती काही वर्षांपूर्वी केली. तसेच पुतळ्याच्या दुरावस्थे बाबत शिवसेनेने महापालिकेत प्रश्न उचलून दुरुस्तीची मागणी केली. मात्र पुतळा कोणी, केंव्हा, कधी बांधला. आदींची नोंदणी महापालिका दफ्तरी नसल्याने, पुतळ्याची दुरुस्ती रेंगाळली. मात्र पुन्हा पुतळ्याच्या दुरावस्थे बाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील गांधी रस्त्यावरील पुतळा शिवाजी महाराज यांचा नव्हेतर, सिंधी संत व सिंधी समाजाचा शेवटचा राजा दहिरसेन यांचा आहे. अशी माहिती जुने जाणते वृद्ध नागरिक देत असल्याचे समाजसेवक शशिकांत दायमा यांचे म्हणणे आहे. २५ ऑगस्ट रोजी राजा दहिरसेन यांची जयंती असून जयंतीचे औचित्य साधून पुतळा व परिसराची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती दायमा यांनी दिली. शिवसेना, मनसे व सामाजिक संघटना यांनी मात्र पुतळ्याची दुरुस्ती व नुतनीकरण करण्याची मागणी बहुतांश पक्ष नेत्यांनी केली. मात्र महापालिकेने अध्यापही पुतळ्या बाबत आपले म्हणणे स्पष्ट केले नाही