एसटीची दुभाजकाला धडक
By admin | Published: June 9, 2016 02:25 AM2016-06-09T02:25:27+5:302016-06-09T02:25:27+5:30
उड्डापुलावर चढतानाच अंदाच न आल्याने एसटी बस दुभाजकाला धडकल्याची घटना बुधवारी पहाटे हिंदमाता उड्डाणपुलावर घडली
मुंबई : उड्डापुलावर चढतानाच अंदाच न आल्याने एसटी बस दुभाजकाला धडकल्याची घटना बुधवारी पहाटे हिंदमाता उड्डाणपुलावर घडली. या घटनेच्यावेळी एसटीत १२ प्रवासी होते. सुदैवाने प्रवासी बालंबाल बचावले.
बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकी न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकते दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू आणि एक जण जखमी झाल्याची घटना दादर पुर्वेकडील जगन्नाथ शंकर शेठ पुलावर पाच दिवसांपूर्वीच घडली होती.
या घटनेनंतर पुन्हा एकदा हिंदमाता उड्डाणपुलावर एसटी अपघाताची घटना घडली आहे. विजयदुर्ग येथून १२ प्रवाशांना घेऊन मुंबई सेन्ट्रल येथे बस येत होती. पहाटे साडे चारच्या सुमारास हिंदमाता उड्डाणपुल चढण्याच्या तयारीत असतानाच एसटी थेट दुभाजकावरच आदळली. दुभाजकावर आदळताच त्याची दोन्ही चाके वर उचलली गेली आणि मोठा आवाज झाला.
बसमधून तात्काळ सुरक्षितरित्या प्रवाशांना उतरविण्यात आले. या घटनेची नोंद भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. तसेच एसटीकडूनही घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. या बसवर चालक म्हणून आर.बी.देसाई होते.(प्रतिनिधी)