स्टीव्ह स्मिथचे पुणेरी फटके

By Admin | Published: April 4, 2017 11:04 AM2017-04-04T11:04:47+5:302017-04-04T11:07:51+5:30

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चक्क पुणेकरांच्या पारंपरिक वेषात अवतरला आहे

Steve Smith's Puner beat | स्टीव्ह स्मिथचे पुणेरी फटके

स्टीव्ह स्मिथचे पुणेरी फटके

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 4 - आयपीएलच्या दहाव्या मोसमाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मैदानात अव्वल ठरण्यासाठी सर्व संघांनी प्रयत्न सुरु केले असून वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. सर्व संघांवरील दडपण वाढत चाललं असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणा-या स्टीव्ह स्मिथने आपल्या संघातील वातावरण थोडं हलकंफुलकं करण्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चक्क पुणेकरांच्या पारंपरिक वेषात अवतरला आहे.
 
आयपीएल पुणे संघाचं नेतृत्व सांभाळत असल्याने आधीच पुणेकर झालेल्या स्टीव्ह स्मिथने प्रमोशनच्या निमित्ताने संपुर्ण पुणेकर होण्याचं ठरवलं आहे. म्हणून प्रमोशनच्या निमित्ताने का होईना पण स्टीव्ह स्मिथने चक्क पुणेरी पारंपारिक वेष परिधान केला होता. इन्स्टाग्रामवर स्टीव्ह स्मिथने आपला फोटो शेअर केला असून स्मिथने बाराबंदी, धोतर, कमरेला शेला, गळ्याभोवती उपरणं आणि डोक्यावर पुणेरी पगडी असा पारंपरिक वेष परिधान केलेला दिसत आहे.
 
या फोटोमध्ये स्टीव्ह स्मिथसोबत भारतीय क्रिकेटर आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्समधील त्याचा सहकारी अजिंक्य रहाणेदेखील दिसत आहे. 
 
पुणे संघाची भूतकाळातील कामगिरी समाधानकारक नसली तरी त्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. संघ नव्या आव्हानांसाठी सज्ज आहे. या मोसमात आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू, असा आशावाद आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे याने सोमवारी पुण्यात व्यक्त केला.
 
सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील लढतीने बुधवारी (दि. ५) आयपीएलच्या दहाव्या सत्राचा प्रारंभ होत आहे. त्यानंतर पुण्याची पहिली लढत गुरूवारी (दि. ६) घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरूद्ध होत आहे. यासाठी संघाचा सराव जोरात सुरू आहे. पत्रकारांशी संवाद साधताना अजिंक्य म्हणाला, ‘‘खरे तर, मागील वर्षी आमच्या संघाने चांगला खेळ केला. पण, आम्ही थोडक्यात पराभूत झालो. एक-दोन षटकांतील खेळाने सामन्याचे निकाल फिरले. पण, खेळात हे चालायचेच. आता या सर्व गोष्टी मागे पडल्या आहेत. मोसमाचा प्रारंभ चांगला होणे महत्वाचे आहे. त्यावर आमचा भर असेल.’’
 
नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीला दुखापत झाल्याने अखेरच्या सामन्यात अजिंक्यने नेतृत्व केले. त्याने नेतृत्वगुण आणि कामगिरीच्या जोरावर भारताला ही निर्णायक लढत जिंकून दिली. यामुळे भारताने २-१ अशा फरकाने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. यासंदर्भातील घडामोडींवर तो भरभररून बोलला. ‘‘दुखापतीमुळे निर्णायक सामन्यात विराट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काही काळ दु:खाचे वातावरण होते. मात्र, लगेच सर्वांनी स्वत:ला सावरत सर्वस्व झोकून खेळण्याचा निर्धार केला. नेतृत्वाचा विचार करता विराट आणि माझी शैली वेगळी आहे. यामुळे अचानक नेतृत्वाची जबाबदारी आल्यावर संघसहकाऱ्यांचा विश्वास कायम ठेवणे, त्यांची लय बिघडू न देणे यावर मी भर दिला. आमचे सर्वांचे लक्ष्य सामना जिंकण्याचे होते. यामुळे एक टीम म्हणून सहजपणे आव्हानांना सामोरे गेलो. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या प्रारंभानंतर आपल्या गोलंदाजांनी जबरदस्त मारा करीत कमबॅक केले. मला विचाराल तर, तो या निर्णायक कसोटीचा टर्निंग पॉर्इंट होता. अर्धा सामना आम्ही पहिल्याच दिवशी जिंकला होता,’’ असे अजिंक्यने सांगितले.
 

Web Title: Steve Smith's Puner beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.