चाकूचा धाक दाखवून रोकड लंपास
By admin | Published: May 9, 2014 07:26 PM2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T22:26:31+5:30
दूधविक्रीतून मिळालेले २९ हजार रूपये घेऊन चाललेल्या सेल्समनला चाकूचा धाक दाखवून रक्कमेची पिशवी हिसकावणार्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : दूधविक्रीतून मिळालेले २९ हजार रूपये घेऊन चाललेल्या सेल्समनला चाकूचा धाक दाखवून रक्कमेची पिशवी हिसकावणार्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांनी आारेपींना ११ मेपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
संदीप साधू कोंढाळकर (वय २७), स्वप्नील मिनानाथ मारणे (वय २३,दोघे रा. हनुमाननगर, कोथरूड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भोला कुमार नरेंद्र सिंग (वय २४, रा. पिंपळे सौदागर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २९ मार्च २०१४ रोजी, भारती विद्यापीठ मोरे विद्यालयाजवळ, कोथरूड येथे घडली. सिंग हा काटे डेअरी पिंपळे सौदागर येथे सेल्समन म्हणून नोकरीला आहे. घटनेच्या दिवशी डेअरीचे ऑर्डरप्रमाणे दूध टाकून पौड रस्त्याकडे जात असताना एका आरोपीने चाकूचा धाक दाखवून दुसर्याने पैशांची पिशवी हिसकावून नेली. आरोपींकडून गुन्ातील रक्कम हस्तगत करायची आहे.