राज पुरोहितांचा ‘स्टिंग’ संवाद

By admin | Published: June 27, 2015 02:28 AM2015-06-27T02:28:09+5:302015-06-27T02:28:09+5:30

एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पक्षात लोकशाही राहिलेली नाही, असे सांगतानाच भाजपा आणि रा. स्व. संघात

'Sting' dialogue of Raj Purohits | राज पुरोहितांचा ‘स्टिंग’ संवाद

राज पुरोहितांचा ‘स्टिंग’ संवाद

Next

मुंबई : एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पक्षात लोकशाही राहिलेली नाही, असे सांगतानाच भाजपा आणि रा. स्व. संघात ‘मनीपॉवर’ चालते, असा गंभीर आरोप केला आहे. स्टिंगमधील संवाद असा -
प्रश्न : पक्षात कोण नवा आहे, कोण जुना आहे, कोण मनापासून काम करतोय याचा विचार होत नाही का?
उत्तर : विचार होऊन उपयोग काय? त्याला ‘सपोर्ट’ कुठे मिळतो? लोढा आहेत ना, मध्ये खो घालायला!
प्रश्न: संघ आणि भाजपाचा लोढांशी काय संबंध आहे?
उत्तर : लोढांचा वरपर्यंत प्रभाव आहे; भाजपातच नाही आरएसएसमध्येही त्याची चालते! हे मानावं लागणार आहे. याला म्हणतात ‘मनी पॉवर.’ लोढा एक सर्वात मोठा बिल्डर आहे, हे माहीतच असेल... एका गुंडासारखंच झालं ना! पैशाने काहीही मॅनेज करण्याची ताकद त्यांच्यात आहे. निवडणुकीतही त्यांनीच अमाप पैसा पक्षासाठी खर्च केला.
प्रश्न : म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा प्रभावाखाली आहेत का?
उत्तर : मुख्यमंत्री तरी काय करणार, वरून निर्णय झाला की मग कुणीच काही करू शकत नाही. मंत्रिपदासाठी माझं नाव आलं की ‘वेट’ करायला सांगितलं जातं.
प्रश्न: निर्णय घेणारे कोण आहेत?
उत्तर : कोण म्हणजे अर्थातच पक्षाचं हायकमांड...
प्रश्न : तुमचा रोख केंद्रातील प्रमुखांवर आहे की अन्य कुणावर?
उत्तर : आता बघा, नैसर्गिकरीत्या अनुभव पाहता मला मंत्री
बनवायला हवं होतं. आता नाही बनवलं तर कुणी ना कुणी
त्यात आडमेळं आणतंय, हे तर नक्कीच आहे ना!
प्रश्न : देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन सत्ताकेंद्रं आहेत, असं म्हटलं जातंय...
उत्तर : त्यात चुकीचं काय आहे? सध्याच्या लोकशाहीला काहीच
अर्थ नाही. पक्षात कलेक्टिव्ह लीडरशीपही (सामूहिक नेतृत्व) उरलेलं नाही, ही धोक्याची बाब आहे. कोणीतरी सामूहिक नेतृत्वाच्या
बाता मारतो, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा बोलतो; मात्र प्रत्यक्षात तसं काही होत नाही. हे कसलं कॅरेक्टर म्हणायचं? १० लोक मिळून काय करणार आहेत?
प्रश्न : केंद्रातील नव्या सरकारच्या धोरणांचे काय?
उत्तर : नरेंद्रभाई चांगलं काम करीत आहेत, मात्र त्यांनी चुका टाळायला हव्यात. काही गोष्टींमुळे अनेक समाज पक्षापासून दूर जात आहेत. आता व्यापाऱ्यांचंच उदाहरण घ्या. अगदी भाजपाचा तो ‘हार्डकोअर सपोर्टर’ आहे. काँग्रेसच्या धोरणानं हा समाज त्रस्त झाला होता. त्यांच्या भाजपाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आता तुम्ही कोणता कायदा बनवला? १ लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने खरेदी करायचे असतील तर पॅनकार्ड बनवावे लागेल. आता देशातील अर्धी इकॉनॉमी तर ब्लॅक मनीवरच चालली आहे.
त्यात तुम्ही अशी पॅनकार्डची अट घातली तर त्याने व्यापाऱ्यांचा धंदा बसणार की नाही? त्यातही पळवाट म्हणून रोज ७५ हजाराचं बिल बनवायचं म्हटलं तरी त्या व्यापाऱ्याची डोकेदुखी वाढली की नाही? थोडक्यात काय तर आपला सर्वात मोठा समर्थक असलेला व्यापारी वर्ग दुखावला गेला आहे. माझे सरकार कुठे आहे, असे त्याने विचारणे स्वाभाविकच आहे.
प्रश्न : काळा पैसा हाही मुद्दा आहेच ना...
उत्तर : हो, तुम्ही ब्लॅक मनीला आळा घालण्यासाठी विधेयक आणण्याचे निश्चित केले आहे. ठीक आहे... आता मला सांगा, पाच लाख काही मोठी रक्कम आहे का? एकीकडे सांगता अडीच लाख डॉलरची गुंतवणूक बाहेरून घ्या आणि त्याचं हवं ते करा आणि दुसरीकडे परदेशात केलेल्या व्यवसायाचा एकेक पैशाचा हिशेब तुम्हाला हवा आहे, यात कॉन्ट्रॅडिक्शन (विरोधाभास) आहे ना? पुन्हा त्यात कुणी अडकला तर शिक्षा किती तर १० वर्षे! हा कल्पेबल होमीसाइडचा (सदोष मनुष्यवध) प्रकार आहे की नाही..? तुम्हाला माझं म्हणणं लक्षात येतंय ना? मी तर देशातील टॉपच्या व्यापाऱ्यांसोबत बसतो. ते सांगतात ना, व्हॉट इज गोइंग आॅन? (हे काय चाललंल?) कसले निर्णय घेता... चाललंय तसं चालू दे ना! प्रत्येक गोष्टीत तुम्ही काळं बघणार तसं कसं चालणार?

Web Title: 'Sting' dialogue of Raj Purohits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.