एसटीला ‘एक्स्प्रेस’ फटका

By admin | Published: March 30, 2017 04:02 AM2017-03-30T04:02:22+5:302017-03-30T04:02:22+5:30

एसटी महामंडळाचा तोटा वर्षाला वाढत असतानाच, त्यातून दिलासा मिळावा, यासाठी टोलमाफीची मागणी सातत्याने केली

STL 'Express' Shot | एसटीला ‘एक्स्प्रेस’ फटका

एसटीला ‘एक्स्प्रेस’ फटका

Next

मुंबई : एसटी महामंडळाचा तोटा वर्षाला वाढत असतानाच, त्यातून दिलासा मिळावा, यासाठी टोलमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून गेल्या काही वर्षांत राज्यातील टोल नाक्यांमधून एसटीची सुटका करत दिलासा दिलेला असतानाच मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील टोलमधून सूट देण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. या मार्गावर १ एप्रिलपासून वाढीव टोल लागू होत असून, त्यामुळे महिन्याला ३१ लाख रुपयांहून अधिकचा टोलभार एसटीला सहन करावा लागेल.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून एसटीच्या शिवनेरी, सेमी लक्झरी आणि परिवर्तन बसेस मोठ्या प्रमाणावर धावतात. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत एसटीच्या बसेसला चांगलाच प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या मार्गावर एसटीकडून विशेष लक्ष देण्यात येते. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गे १ हजार २५ बसफेऱ्या होतात. या मार्गावरून धावताना, यातील प्रत्येक बसफेरीमागे या
आधी एसटीला ५७२ रुपये टोल भरावा लागत होता. आता १ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील टोलमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यामुळे एसटीला
६७५ रुपये टोल भरावा लागेल. जवळपास १0३ रुपये एवढा जादा टोल द्यावा लागणार असल्याने, प्रत्येक दिवशी १ लाख ५ हजार रुपयांपेक्षा अधिक, तर महिन्याला ३१ लाखांहून अधिक टोल भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर एसटीकडून प्रत्येक दिवशी ६ लाख ९ हजार, याप्रमाणे महिन्याला १ कोटी ७३ लाखांचा टोल भरला जातो. यामुळे एसटीला लाखोंचा आर्थिक फटका सहन करावा लागेल. एकीकडे एसटीला पूर्णपणे टोलमुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन दिले जात असतानाच, चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसकडे मात्र, दुर्लक्षच होताना दिसते. (प्रतिनिधी)

नोटाबंदीमुळे ६ कोटी ७६ लाखांची बचत
२0१६ मधील नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. टोल नाक्यांवरही नोटकल्लोळाचा फटका बसल्याने, यातून सरकारने वाहन चालकांना दिलासा दिला. त्यामुळे महामंडळाला दिलासा मिळाला आणि ६ कोटी ७६ लाखांहून अधिकची बचत झाली.

Web Title: STL 'Express' Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.