‘अश्वमेध’साठी मोजा १,७३४ रुपये

By admin | Published: January 15, 2016 01:50 AM2016-01-15T01:50:40+5:302016-01-15T01:50:40+5:30

खासगी बससेवांशी असलेली स्पर्धा आणि जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या आरामदायी अशा मल्टीएक्सेल बसेस विकत घेतल्या.

The stock for 'Ashwamedh' is Rs 1,734 | ‘अश्वमेध’साठी मोजा १,७३४ रुपये

‘अश्वमेध’साठी मोजा १,७३४ रुपये

Next

मुंबई : खासगी बससेवांशी असलेली स्पर्धा आणि जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या आरामदायी अशा मल्टीएक्सेल बसेस विकत घेतल्या. यातील दोन बसेस ताफ्यात दाखल होतानाच, गुरुवारी मुंबई ते हैद्राबाद मार्गावर एक स्कॅनिया बस चालवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, ही सेवा सुरू करताना आरामदायी प्रवासासाठी १,७३४ रुपये अवाच्या सव्वा भाडे आकारण्यात आले आहे. त्यामुळे या सेवेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळेल का, असा प्रश्न एसटी अधिकाऱ्यांनाच पडला आहे.
मुंबई ते हैद्राबाद मार्गावर स्कॅनिया कंपनीच्या एका एसी बसचा शुभारंभ परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला. ५१ आसनी असलेल्या
या बसला ‘अश्वमेध’ नाव एसटीकडून देण्यात आले आहे. फ्री वाय
फाय, सीसीटिव्ही कॅमेरा, एफएमएस (फ्लिट मॅनेजमेन्ट सीस्टम), एलईडी टिव्ही स्क्रीनसह आरामदायी आसनव्यवस्था बसमध्ये उपलब्ध आहेत.
मुंबई ते हैद्राबाद या १३ तासांच्या प्रवासात ही बस स्वारगेट, सोलापूरमार्गे जाईल. मात्र, मुंबई ते हैद्राबाद या प्रवासासाठी प्रवाशांना १ हजार ७३४ रुपये भाडे मोजावे लागणार आहे. याच मार्गावर अन्य खासगी बस धावत असून, त्यांच्याकडून ५00 रुपये कमी भाडे आकारण्यात येते. त्याचप्रमाणे दादर येथून हैद्राबादसाठी आंध्र प्रदेश स्टेट रोड कॉर्पोरेशनची बससेवा असून, त्याचे भाडे हे १,३00 रुपये आहे. त्यामुळे एसटीकडून अवाच्या सव्वा भाडे आकारल्यास प्रवासी मिळणार का, असा प्रश्न एसटीच्या अधिकाऱ्यांनाच पडला आहे.

नियोजनात एसटी पडली कमी
स्कॅनिया एसी बस गुरुवारपासून एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आली. मात्र, ही बस सुरू करण्यात येत असल्याची जाहिरातच करण्यात आली नाही, तसेच प्रवाशांनाही त्याची पूर्वकल्पना नसल्याने पहिल्याच फेरीला प्रतिसाद मिळाला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईहून ही बस १३.00 वाजता सुटून हैद्राबादला 0२.१५ वाजता पोहोचेल. ही बस सुटण्याची वेळही चुकीची असल्याने गाडीला प्रवासी मिळतील का, या चिंतेत एसटी प्रशासन आहे. या मार्गावर आणि त्याच वेळेवर आधी एक सेमी लक्झरी बस धावत होती. ती बंद करून स्कॅनिया कंपनीची एसी बस सुरू केली.

अवैध वाहनांना
प्रवेश बंदी करणार
एसटी स्थानक किंवा आगारातून अवैध वाहनांकडून प्रवाशांना नेण्यात येत असल्याने, एसटीला मोठा फटका बसतो. हे पाहता एसटीच्या २00 मीटर हद्दीत अवैध वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येईल. तसे आदेश एसटी अधिकाऱ्यांना दिल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

फसलेले प्रयोग : मुंबई सेंट्रल ते बेंगलोर, मुंबई सेंट्रल ते पणजी व मुंबई सेंट्रल ते नागपूर मार्गावर एसी आरामदायी बसेस चालवल्या. मात्र, प्रयोग चांगलेच फसले. बेंगलोर व पणजी मार्गावर तर दोन वेळा एसी बस चालवून त्याचे भाडेही मोठ्या प्रमाणात ठेवले आणि प्रवाशांनी पाठच फिरवली.

मुंबई ते हैद्राबाद भाडे
मार्गप्रौढ लहान मूल
मुंबई ते हैद्राबाद१,७३४८६८
मुंबई ते सोलापूर१,१0६५५३
मुंबई ते स्वारगेट४४२२२१

Web Title: The stock for 'Ashwamedh' is Rs 1,734

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.