शेअर बाजारात मोठी उसळी
By admin | Published: February 1, 2017 03:45 PM2017-02-01T15:45:47+5:302017-02-01T15:45:47+5:30
अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर शेअर बाजार मोठ्या प्रमाणात वधारला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर शेअर बाजार मोठ्या प्रमाणात वधारला आहे. मुंबई शेअर बाजारानं 485.68 अंकांनी उसळी घेतली असून, निफ्टीतही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सेन्सेक्स 485.68 अंकांनी वधारून 28,141.64 वर जाऊन पोहोचला आहे. अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करत असतानाच शेअर बाजारात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर शेअर बाजारात चढ-उतार सुरूच होता. मात्र अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात झेपावला आहे. त्यामुळे अरुण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचंही पाहायला मिळालं आहे.