शेअर बाजाराची तेजी कायम

By Admin | Published: June 9, 2014 11:48 PM2014-06-09T23:48:56+5:302014-06-10T09:41:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गुंतवणूकदारांकरिता अनुकूल आर्थिक धोरण स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

The stock market continued to grow | शेअर बाजाराची तेजी कायम

शेअर बाजाराची तेजी कायम

googlenewsNext
>मुंबई : शेअर बाजारातील तेजीचे सत्र सलग तिसर्‍या दिवशीही सुरूच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गुंतवणूकदारांकरिता अनुकूल आर्थिक धोरण स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८३.७५ अंकांनी वाढून २५,५८0.२१ या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा ७१ अंकांच्या वाढीसह ७,६५४.६0 अंकावर पोहोचला.
बजाज ऑटो, कोल इंडिया आणि एल अँड टीसह सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २0 कंपन्यांचे शेअर्स फायद्यासह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील विविध १२ क्षेत्रांपैकी १0 क्षेत्रांतील शेअर्स नफ्यात राहिले. 
यादरम्यान गुंतवणूकदारांच्या भांडवलात एक लाख कोटी रुपयांची भर पडली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या वृद्धीसाठी सरकार प्रतिबद्धता व्यक्त केली. (प्रतिनिधी)
गुंतवणूक वाढली 
मागील शुक्रवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी १,२८३.0४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्याचप्रमाणे २0१४मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी ५0,000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे

Web Title: The stock market continued to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.