पेट परीक्षेचा गोंधळ सुरूच

By Admin | Published: September 19, 2016 05:41 AM2016-09-19T05:41:41+5:302016-09-19T05:41:41+5:30

मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी.साठीची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी घेण्यात आली.

Stomach test messy up | पेट परीक्षेचा गोंधळ सुरूच

पेट परीक्षेचा गोंधळ सुरूच

googlenewsNext


मुंंबई : मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी.साठीची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या अखेरच्या दिवसापर्यंत हॉलतिकीट न मिळाल्याने तब्बल २४२ विद्यार्थ्यांना धावपळ करून हॉलतिकीट मिळवावे लागले. शनिवारी दुपारी १९ केंद्रांवर पेट घेण्यात आली. यंदा या परीक्षेसाठी ३ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हॉलतिकिटासंबंधीची सूचना देण्यात आली. मात्र अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नाही. हॉलतिकीट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ सांभाळत विद्यापीठात हॉलतिकिटासाठी जावे लागले. याचा सर्वाधिक फटका मुंबईबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना बसला. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडली, असा दावा विद्यापीठाने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stomach test messy up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.