सीओ-एटीव्हीएम सेवा बंदच

By admin | Published: July 23, 2016 02:26 AM2016-07-23T02:26:11+5:302016-07-23T02:26:11+5:30

तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत एटीव्हीएम आणि जेटीबीएस मशिन मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसवण्यात आले.

Stop the CO-ATVM service | सीओ-एटीव्हीएम सेवा बंदच

सीओ-एटीव्हीएम सेवा बंदच

Next


मुंबई : तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत एटीव्हीएम आणि जेटीबीएस मशिन मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसवण्यात आले. त्याला पर्याय म्हणून कॅश कॉइन आॅपरेटेड मशिन (सीओ-एटीव्हीएम) बसवण्यात आले. या यंत्राला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच त्यात काही गैरप्रकार होत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले. हे पाहता सुरुवातीला या मशिनमधून स्मार्ट कार्डला तात्पुरता विराम दिला असतानाच यात आता कॅश आणि कॉइन टाकून तिकीट देणाऱ्या सेवेलाही विराम देण्यात आला आहे. रेल्वे बोर्डानेच देशभरातील रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या सीओ-एटीव्हीएम सेवेला तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या क्रिस संस्थेमार्फत आॅक्टोबर २0१५ मध्ये मध्य रेल्वेवर सीओ-एटीव्हीएम सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर एकूण १७0 मशिन्स बसवण्यात आली आहेत. पुणे, त्याचबरोबर देशभरातील काही रेल्वे स्थानकांतही ही सुविधा सुरू करण्यात आली. पाच आणि १0 रुपयांची नाणी तसेच ५ रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या महात्मा गांधीजींच्या सीरिजमधील नोटा मशिनमध्ये टाकताच त्यातून प्रवाशांना तिकीट मिळते. तसेच स्मार्ट कार्डव्दारे तिकीट देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. मात्र मुंबई व पुण्यातील स्थानकांत एका व्यक्तीकडून त्यात गैरप्रकार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात येताच त्याच्याकडे २२ स्मार्ट कार्डही असल्याचे आढळले. यातील काही स्मार्ट कार्डचा गैरवापर करण्यात आला होता. ही बाब समोर येताच सीओ-एटीव्हीएममधील स्मार्ट कार्ड सेवा १४ जुलैपासून बंद करण्यात आली. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वेकडून कॅश आणि कॉइनची सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी १६ जुलैपासूनच करण्यात आली आहे. याबाबत क्रिस संस्थेचे (मुंबई) महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यातील तांत्रिक बाबी सोडवण्यात येत आहेत. लवकरच सीओ-एटीव्हीएम सेवा येईल. सुरुवातीला यातून स्मार्ट कार्डची सुविधा बंद करण्यात आली होती. आता कॅश कॉइनची सुविधाही बंद करण्यात आली आहे. देशातील स्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली जाईल. (प्रतिनिधी)
>कॅश कॉइनची सुविधाही बंद
क्रिस संस्थेचे (मुंबई) महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यातील तांत्रिक बाबी सोडवण्यात येत आहेत. लवकरच सीओ-एटीव्हीएम सेवा येईल. सुरुवातीला यातून स्मार्ट कार्डची सुविधा बंद करण्यात आली होती. आता कॅश कॉइनची सुविधाही बंद करण्यात आली आहे.

Web Title: Stop the CO-ATVM service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.