वृक्षतोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलन; वर्धेकरांचा एल्गार, पालकमंत्र्यांना दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 10:31 PM2020-08-09T22:31:37+5:302020-08-09T22:32:42+5:30
या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे.
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. यात ७० वृक्ष आधीच जमीनदोस्त झाले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सुरू आहे. याला विरोध दर्शवत वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांनी पालकमंत्री सुनील केदार यांना वृक्षतोड थांबविण्याबाबत संयुक्त निवेदन दिले. चौपदरी रस्ता रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली होणा-या या वृक्षतोडीत महात्मा गांधी, कस्तुरबा आणि त्या काळातील अनेकांनी लावलेली ७०-८० वर्षे जुनी झाडे तसेच सामाजिक संघटनांनी गत दोन दशकात लावलेल्या झाडांचीही कटाई करणे सुरू आहे.
ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेऊन विकासकामे करावीत अशी मागणी डाॅ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, संजय इंगळे तिगावकर, सुषमा शर्मा, ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, मुरलीधर बेलखोडे, डाॅ. विभा गुप्ता, डाॅ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डाॅ. लोकेश तमगिरे, डाॅ. सोनू मोर, डाॅ. प्रणाली कोठेकर, डाॅ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अद्वैत देशपांडे, सूचि सिन्हा, प्रभाकर पुसदकर, डाॅ आलोक बंग, डाॅ. अनुपमा गुप्ता, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, दर्शन दुधाने, अतुल शर्मा, अनिल फरसोले, निरंजना मारू, अॅड. पूजा जाधव, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, मुकेश लुतडे, जीवन अवथरे, किशोर अमृतकर, शरद ताकसांडे, भाग्यश्री उगले, वर्षा खर्डे, भाऊ चन्नोळे, शंकर भोयर, अक्षद सोमनाथे, तीर्थेश लुतडे, मयूर नागोसे, यश, आशीष चव्हाण, सुमीत उगेमुगे, मोहीत सहारे, प्राजक्ता मुते, गुरुराज राऊत, चेतन परळीकर, रोहिणी बाबर, सुनील ढाले, विनोद साळवे, रुपाली भेदरकर, राजश्री चौधरी, नैना गोबाडे, भूमिका गुडधे, प्रगती आंबूलकर, प्रिया कोंबे, विकेश तिमांडे, वैभव फुलकरी, कार्तिक इंगळे, लक्ष्मी नाईक, जयश्री कामडे, वैभव वासेकर, अफरोज शेख, श्वेता नारायणे यांच्यासह सुमारे दोनशे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे.