धनगर समाजाची फसवणूक थांबवा
By admin | Published: October 25, 2016 09:36 PM2016-10-25T21:36:46+5:302016-10-25T21:44:32+5:30
धनगर आरक्षणावरून मंगळवारी धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला होता. भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाची फसवणूक थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - धनगर आरक्षणावरून मंगळवारी धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला होता. भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाची फसवणूक थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचने आझाद मैदानात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, सत्तेवर येण्याआधी १५ दिवसांत आरक्षण देण्याचा दावा भाजपने केला होता. मात्र राज्यात आणि केंद्रात सत्तेवर येऊन भाजपला दोन वर्षे उलटली असतानाही आरक्षणाबाबत चुप्पी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धनगर समाजाच्या नेत्यांना मंत्रिपदे देऊन टीससारख्या खासगी समिजीची नेमणूक करून सरकार समाजाची फसवणूक करत आहे. तरी तत्काळ फसवणूक थांबवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्याचा इशारा पाटील यांनी दिला. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सवलत देण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे मंचाने स्पष्ट केले. मंगळवारी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयीन लढाईचा एल्गार पुकारण्यासाठी आझाद मैदानात मंचाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी समाज
बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत लोकसंगीताच्या तालावर गजनृत्य खेळत भंडारा उधळला. शिवाय सरकारने यापुढेही दुर्लक्ष केले, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.