पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Published: May 17, 2016 02:17 AM2016-05-17T02:17:26+5:302016-05-17T02:17:26+5:30

पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली पाटीजवळ ग्रामस्थांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the path of villagers for water | पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

Next

राजेगाव : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील गावतळ्यात खडकवासला कालव्याची वितरिका क्रमांक ३५ मधून पिण्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज (दि.१४) रोजी पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली पाटीजवळ ग्रामस्थांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरपंच गजानन गुणवरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या वेळी महिलांनी उपस्थित अधिकार्यांना प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. खडकवासला धरणातून कालव्याव्दारे इंदापूर व दौंड तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाच्या नियोजनप्रमाणे प्रथम इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलाव व शिर्सुफळ तलाव भरल्यानंतर काव्याच्या वितरिका क्रमांक ३५ मधून खडकी गावातील ओढ्यावरील बंधारा भरून घेण्यात आला. मात्र याच वितरिकेवर पुढे४-५ किलोमीटर अंतरावर असणाऱ््या स्वामी चिंचोली गावतळ्यात पाणी सोडण्यात आले नाही. पाटबंधारे विभागाच्या ह्यटेल टू हेडह्ण या नियमानुसार खडकी गावाच्या प्रथम स्वामी चिंचोली गावाला पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र पाटबंधारे विभागाने खडकी येथील बंधारा भरल्यानंतर वितरिकेचे पाणी बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहेत.
यावेळी सरपंच गजानन गुणवरे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे , रामराजे शिंदे, सिताराम ननवरे, चंद्रकांत होले , वसिम शेख, मल्हारी होले, झुंबर शिंदे, पोपट मिंढे , एकनाथ पानसरे , महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सरपंच गजानन गुणवरे म्हणाले, की गेल्या महिन्यापासून गावतळे कोरडे पडले असल्याने त्या गावतळ्यालगत असणाऱ्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. लोकांच्या व जनावराच्या पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. ४000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आमच्या गावाला शासनाने फक्त एकच टँकर मंजूर केला आहे. त्यामधून उजनीचे दुर्गंधीयुक्त पाणी गावाला दिले जात आहे. तेही प्रत्येक नागरिकाला आठ दिवसांच्या अंतराने मिळत आहे.

Web Title: Stop the path of villagers for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.