‘बाजीराव मस्तानी’चे प्रदर्शन थांबवा
By Admin | Published: November 24, 2015 03:00 AM2015-11-24T03:00:48+5:302015-11-24T03:00:48+5:30
बाजीराव मस्तानी या चित्रपटात ‘पिंगा’ या गाण्यामध्ये पेशव्यांच्या पत्नी काशीबाई व मस्तानी अश्लील नृत्य करताना दाखविले आहे. ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही.
पुणे : बाजीराव मस्तानी या चित्रपटात ‘पिंगा’ या गाण्यामध्ये पेशव्यांच्या पत्नी काशीबाई व मस्तानी अश्लील नृत्य करताना दाखविले आहे. ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही...’ अशा वादग्रस्त टॅगलाइनमुळे सामाजिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल झाली आहे.
हेमंत पाटील व फिरोज शेख यांनी अॅड. वाजेद खान (बिडकर) यांनी ही याचिका दाखल केली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या काळी मराठी महिला या पडद्यामध्ये असायच्या, चित्रपटात दाखविल्याप्रमाणे त्या काळात अश्लील नृत्ये केली जात नव्हती. सध्या चित्रपटाचे काही अंश दाखविले जात असून, त्यामध्ये ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नहीं’ अशी टॅगलाइन आहे. मस्तानी ही बुंदेलखंडमधील राजा छत्रसाल यांच्या दरबारातील कुशल कलावंतीण होती. तिला अशा प्रकारे संबोधणे अयोग्य आहे, असे दाव्यामध्ये म्हटले आहे.