औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

By admin | Published: June 27, 2014 10:56 PM2014-06-27T22:56:41+5:302014-06-27T22:56:41+5:30

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 3क्क् औषधविक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरूच राहील.

Stop the pharmaceutical dealers | औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

Next
>पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 3क्क् औषधविक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरूच राहील. उलट मागणी मान्य न झाल्यास शनिवारपासून सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील औषधविक्रेतेदेखील बंदमध्ये सहभागी होतील, असा इशारा महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. 
फार्मासिस्ट नसलेली औषध दुकाने, डॉक्टरांच्या चिठीशिवाय व बिलाशिवाय औषधविक्री करणा:या दुकानदारांविरोधात एफडीएने मोहीम उघडली आहे. जून महिन्यात शहरातील 3क्क् औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांवरील कारवाई 
मागे घ्यावी, यासाठी केमिस्ट असोसिएशनने गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत बंद सुरू केला आहे. शुक्रवारी शहरातील औषधविक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. बंदबाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी पुणो केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी संघटनेचे अध्यक्ष शिंदे यांनी आपली भूमिका जाहीर केली.  
शिंदे म्हणाले, ‘‘एफडीएकडून औषधविक्रेत्यांविरोधात आकसाने कारवाई करण्यात येत आहे. एफडीए आयुक्त महेश झगडे यांनी प्रत्येक अधिका:याला कारवाईचा कोटा ठरवून दिला आहे. जून महिन्यात शहरातील 3क्क् दुकानांवर कारवाई केली असून, त्यांतील दीडशे 
दुकानांना औषधविक्री करण्यास मनाई केली आहे. ही कारवाई करताना त्यांना नोटीसही देण्यात आली 
नव्हती. त्यावर चर्चा करण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी गुरुवारी एफडीएच्या अधिका:यांना 
भेटण्यास गेले होते. ही बैठक संपल्यानंतर एफडीएच्या अधिका:यांनी लगेच संघटनेच्या पदाधिका:यांच्या दुकानाची तपासणी सुरू केली, यावरून त्यांची सूडबुद्धी लक्षात येते.’’
एफडीएचे आयुक्त झगडे यांच्या आदेशावरूनच ही कारवाई करण्यात आली. आयुक्त हम करे सो कायदा अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे पुण्यातील औषधविक्रेत्यांवरील कारवाई मागे न घेतल्यास पहिल्या टप्प्यात सातारा, सांगली, कोल्हापूर तर पुढील टप्प्यात राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल. (प्रतिनिधी)
 
कायद्याचे पालन न करणा:या औषधविक्रेत्यांवर यापुढेही कारवाई सुरुच राहील. त्यामुळे औषधविक्रेता संघटनेने आंदोलन मागे न घेतल्यास शनिवारपासून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत  कारवाई केली जाईल.
- एस. टी. पाटील
सह आयुक्त एफडीए 

Web Title: Stop the pharmaceutical dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.