औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

By admin | Published: June 28, 2014 01:05 AM2014-06-28T01:05:08+5:302014-06-28T01:05:08+5:30

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तीनशे औषध विक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरुच राहील.

Stop the pharmaceutical dealers | औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

Next
>पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तीनशे औषध विक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरुच राहील. उलट मागणी मान्य न झाल्यास शनिवारपासून सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेतेही बंदत सहभागी होतील असा इशारा महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 
फार्मासिस्ट नसलेली औषध दुकाने, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व बिला शिवाय औषध औषध विक्री करणा:या दुकानदारांविरोधात एफडीएने मोहीम उघडली आहे. जून महिन्यात शहरातील तीनशे औषध विक्रेत्यांवर कारावई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी केमिस्ट असोसिएशनने गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत बंद सुरु केला आहे. शुक्रवारी शहरातील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. बंदबाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी पुणो केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पुर्वी संघटनेचे अध्यक्ष शिंदे यांनी आपली भूमिका जाहीर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the pharmaceutical dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.